Tuesday, January 29, 2013

मनशक्ती

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या १२ गुणांचा विकास आवश्यक आहे:


१) परीक्षायश Exam Success

२) चांगले शरीर Good physique

३) क्रिडा कौशल्य Skill In Sports

४) कला नैपुण्य Skills in Arts

५) देशप्रेम / मानवप्रेम patriosm

६) कृतज्ञता बुद्धी Gratitude

७) चांगले वागणे Good Behavior

८) दुरदृष्टी Vision

९) व्यवहार buisness attitude

१०) शांतीप्रेम Peaceful

११) निर्भय,धाडस Courage

१२) नैतृत्वगुण Leadership







तुमच्या मनाला शिकवा आणि तुमच्या मेंदुमध्ये योग्य बदल घडवा : TRAIN YOUR MIND , CHANGE YOUR BRAIN







मेदाविकासासाठी म्हणजेच मेंदूच्या विकासासाठी खालील उपाय :

अनुभवांच्या आधारे मेंदूची लवचिकता वाढवा

उत्तम रीतीने पाठांतर करायला शिकवा ,पुनरुच्चाराने मज्जापेशींची वाढ व जुळवणूक होते

सराव (practice ) वाढवा ,एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लावा त्यामुळे ज्ञानाची बांधणी होते

विश्वासाचे वातावरण तयार करा त्यामुळे वागण्यात सोपेपणा येतो

एकाग्रतेची सवय वाढवा (ज्योतीकडे एकटक बघणे)



मुलांच्या हुशारीला संस्काराची दिशा द्यायला हवी



मुलांचे व्यक्तिमत्व ३ पातळ्यांवर अवलंबून असते या तीन पातळ्यांवर विकास करावा ---->

१)मन (स्वभाव) २)शरीर (आरोग्य) ३)बुद्धी (मेंदू)



लहानपणीच्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात

लहान मुलांची ग्रहण क्षमता प्रचंड असते त्यांना जास्तीत जास्त गोष्टीना एक्स्पोस करा

आई वडिलांनी मुलांना क्वालिटी टाइम द्यावा, नुसती सोबत देऊ नये

मुलांच्या जडण घडणीत वातावरणाचा ५०% वाटा असतो ,चांगली वातावरण निर्मिती हि पालकांची जबाबदारी असते.

लहानपणापासून विधायक व + ve विचारांना प्रवृत्त करा.

भीती व राग व्यवस्थित हाताळा.

भावनांच्या अतिरेकाचे वाईट परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगा

प्रार्थना,एकाग्रता व खेळ यांची सवय लावा

चांगल्या पुस्तकाचे वाचन स्वत व मुलांनी करावे

मुलांना न्युरोबिक्स करायला लावा----यामुळे मेंदूला चालना मिळते पेशी उत्तेजित होतात व मेंदूला व्यायाम मिळतो उदा. दैनंदिन कार्य उलट्या हाताने करावे,डोळे बंद करून शर्टची बटणे लावणे ,डोळे मिटून वर्तुळ काढणे इ.

स्वार्थ शिकवावा लागत नाही निस्वार्थ शिकवावा लागतो