काही लिहायचं म्हंटल तर मनात विचारांचा ,आठवणींचा गोंधळ उडतो . हे लिहू कि ते लिहू ?काय नि कसं लिहू …लिहायलाच पाहिजे कां ,असं होऊन जात …चित्त भरकटत जातं . मनात विचार असावा एक नि लिहिताना भरकट जाव व काहीतरी दुसरंच कागदावर उतरावं असा होतं .
मी लिहितो किंवा लिहू शकतो किंवा काहीतरी खरडतो,काहीही असेल पण चांगलं काहीतरी लिहिलं गेलं कि समाधान मिळतं .तुम्ही केलेली कुठलीही गोष्ट दुसऱ्याने अप्रिशिएट केली कि आपल्याला मुठभर मांस चढत ,बंर वाटतं . अजुन काहीतरी करण्याची उर्मी येतें हे बहुतांशी खरय.शेवटी स्तुती कुणाला आवडत नाही ?पण खरच फक्त स्तुतीसाठी सगळ करतो आपण ? हम्म नाही !आपल्याला मान्य नाही बुवा !कुठलीतरी गोष्ट करायची म्हटल्यावर ती आपसूकच आवडीने होते…. हां कधीकधी ती सुरु करायचा मुहूर्त महिनोन महिने येत नाही किंवा रेगुल्यरिटि राहत नाही .
माझ्या बाबतीत म्हनायचं तर मला अनेक गोष्टी कराव्याश्या वाटतात ,कधी लिहावसं वाटतं ,खुओप फिरावस वाटतं , चित्रं काढावीशी वाटतात ,फोटो काढावेशे वाटतात…तशी लिस्ट लांबतच जाईल ,पण मला वाटत ह्या सगळ्या किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कराव्या वाटणाऱ्या गोष्टी करत जगण्यात एक मजा आहे . नवीन काही शिकण्यात ,त्यात पारंगत होण्यात नशा आहे.
अगदीच माझ्याबाबतीत ट्रेकिंगच उदाहरण द्यायचं झालं तर मी हार्ड कोअर ट्रेकर नव्हे ,अगदी हौशी म्हटलं तरी चालेल .त्यात ह्याविषयी आयुष्यात उशिरा कळाले क़धितरि वाटत ऐन तारुण्यात किंवा विशीत म्हणू हवतर ,बर्याच गोष्टींबाबत अभिनिज्ञच होतो मी आताची तरुण मुलं हे सगळ करताना बघितलं कि हेवा वाटतो . वाटत सहीये यार वेळेवर सगळं करतायत मजा घेतायत आयुष्याची . असो देर आये दुरुस्त आये हेही नसे थोडके…
डोंगरात ,रानावनात भटकण हे बर्याच जणांसाठी तस पचायला जड क़ाय असत त्या डोंगरात ,सगळे दगड इथून इथून सारखेच हा बर्याच जणांचा सूर .पन कसं सांगणार त्यातून काय मिळतं ते ? एक नशा येते,तरतरी येते ,जोम येतो ,मरगळ निघून जाते ,पुढील काही महिने धकाधकीच्या आयुष्यात जगायचे बळ येते ।कधितरि वाटते कशाला आलोय इकडे एवढी पायपीट करतोय ,शरीर त्रासतोय पुन्हा नाही करायचं हे सगळं …हा शेवटचा ट्रेक . पण परत काही दिवसांनी पुन्हा वेध सुरु होतात .पुन्हा पुन्हा डोंगरात जाण्याची उर्मी दाटून येते ….
काही गोष्टी स्पष्टीकरणासाठी करायच्याच नसतात .त्य करायच्या असतात स्वतःसाठी आयुष्य भरभरून जगण्यासाठी ,जगण्यातील आनंद दुप्पट करण्यासाठी .बरेच्जन ते करतातच म्हणा . काही सरळमार्गी अपवाद . आपलं म्हणणं एकच शौकको पालना सिखो …कधी मोजून रिस्क घेऊन,कधी वेळ सांभाळून तर कधी खिशाला कमी चाट पाडून !!!!
म्हंटल न विषय कुठून सुरु होईल नि कुठे जाईल काही समजत नाही.लिहायला घेतलं एक वाहत गेलो दुसरीकडेच असं झालंय …असो आता …बर्यच दिवसांनी काहीतरी लिखाण झालं . वाटलं म्हणुन झालं करायचं म्हणून नाही हे महत्वाचं !!!
प्रशांत पं मयेकर ,३०/३/१६