Tuesday, November 13, 2012

असे कोणत्या क्षणी मन बेधुंद होते

असे कोणत्या क्षणी मन स्वच्छंद होते

मनातल्या डोहात उठती तरंग वेडे
धावती पैलतीरी परी किनारा न सापडे

कैक आठवणी त्या त्तेथे लपून आहेत
भेटल्यावारी आठवे ,का त्या जपून आहेत
न उमजे कुणाला अत्तराची कुपी ती
उघडताच दरवळे नवप्राप्तय जशी ती

मन न येई मागे बळे ओढून त्यास आणे
हे कलयुग आहे वेड्या एक समय तोची जाणे

नकोच ती अति रम्य भूत काल विश्वे
सारथ्य भविष्ये करू घेऊन नवी अश्वे



No comments: